Friday, May 11, 2012

याहू ....सुट्टी लागली!!! मज्जाच मज्जा!!!




हेल्लो मित्रांनो! 

सध्या मी सुट्ट्या enjoy करण्यात फार बिझी आहे. आधी मी आजी-आजोबांकडे गेलो. तिथे भरपूर नवीन मित्र बनवले. वाळूत खेळलो. पाण्यात डुंबलो. अशी खूप खूप ऐश केली. सध्या मुक्काम आत्याच्या घरी आहे. तिथे श्रेयश दादा, गौरी दीदी सोबत माझी खूप मस्ती चालू आहे. तर तिथलीच एक गम्मत मी तुम्हाला सांगतो बर का!

माझी आत्या किनई शिकवण्या घेते. पाचवीपासून बारावी पर्यंत . सुट्टी असली तरी बिच्चाऱ्या दहावीच्या मुलांना यावच लागत . तर एकदा काय झाल माहितीये का? एका दहावीच्या दादाला मी विचारलं कि तुला शुभं करोति येत का? तर काय गम्मत ! तो नाही म्हणला! मग मी त्याला शुभं करोति म्हणून दाखवलं. हे सगळ आत्यानी ऐकल आणि म्हणाली कि मी रोज या मुलांना शुभं करोति शिकवायचं. मी आता रोज सगळ्या दहावीच्या मुलांना शुभं करोति शिकवतो आणि त्याची फी पण वसूल करतो. कशी? तर आमच ठरलय कि रोज एकतरी दहाविवाला दादा / दीदी मला चॉकलेट आणणार. आहे न ऐश?

आणखीन बऱ्याच गमती जमती चालू आहेत पण त्या पुढच्या वेळेस सांगेन. तोपर्यंत तुम्ही सगळे  खालचे फोटो enjoy करा. ( हे च  सगळ  मी खातोय  ना इकडे! ) 

ताजा कलम :  आत्या उद्या माझ्या  साठी पावभाजी बनवणार आहे! तुम्हाला टुक  टुक  वडा !! 


6 comments:

  1. मेन्यू फारच जोरदार आहे. एन्जॉय! :)

    ReplyDelete
  2. तुझी निरागसता ,आणि धमाल मस्ती पाहून आमचे बालपण आम्हाला टुक टुक करत ह्या भल्या मोठ्या खडतर व निष्टुर जगात तारुण्याच्या हवाली करून गेल्याची प्रकर्षाने जाणीव केली.
    मज्जा कर.

    ReplyDelete
    Replies
    1. ब्लॉगवर स्वागत! लहान असतांना सतत मोठ व्हाव स वाटत आणि मोठ्ठ झाल्यावर लहान व्हावस वाटत .

      Delete
  3. आता आम्ही पण येणार हे सगळं खायला .....

    ReplyDelete