Tuesday, December 27, 2011

आई मी मोठ्ठा होतोय गं!


प्रसंग - पहिला:
सकाळची घाई-गडबडीची वेळ. आई तिच्या कामात super busy. तिचं पोळ्या करणं आणि माझ्या प्रश्नांना उत्तरे देणं simultaneously सुरु.
मी: आई, सांग ना!
आई: काय?
मी: आपलं तोंड ओलं का असतंय?
आई: कारण तोंडात लाळ असते ना.
मी: म्हणजे पाणी का?
आई: हो तसंच समज.
मी: पण मग पाणी ओलं का असतंय?
आई: ते तू बाबांना विचार. त्यांना chemistry चांगले येते.
मी आता आईवर खूप रागावलो! ती माझ्याशी बोलतच नाही नीट!

प्रसंग - दुसरा:
वेळ साधारण संध्याकाळची. मी बाबांची वाट बघत असतो.
मी: आई, आई बाबा केव्हा येतील? ते इतका वेळ ऑफिसात का काम करतात?
आई (दुसऱ्याच कुठल्या तरी कामात गर्क) : हं ..........काय ?
मी: ऑफिसातली सगळी माणसे म्हातारी झाल्यावर ऑफिसात काम कोण करेल?
आई : तेव्हा जे तरुण असतील ना ते करतील कि!
(आई : याला हे प्रश्न सुचतात कुठून?)
मी: अगं पण मी म्हणालो ना कि सगळी माणसे म्हातारी झालीत. सगळी म्हणजे अगदी सगळी!
आई (थोडी चिडलीये पण बोलतेय) : हे बघ माधव, आत्ता तू लहान आहेस
मी (मध्येच वाक्य तोडत): मी लहान नाहीये आता. ईशान्य लहान आहे!
आई: अरे, ऐक तर! तू इशू पेक्षा मोठ्ठा आहेस ना पण बाबांपेक्षा तर लहान आहेस कि नाही ? तर तुझे बाबा म्हातारे होतील तेव्हा तू मोठ्ठा असशील ना? मग अशीच इतर मुले जी आत्ता लहान आहेत पण काही वर्षांनी मोठ्ठी असतील ती करतील कि ऑफिसात काम!
मी (गोंधळलेला) : मला वाटलं कि सगळे म्हातारे झाले कि ऑफिस बंद पडेल.

असा मी ना हल्ली खूप प्रश्नाळू झालोय. मी आईला, बाबांना, काकांना, काकूला दिसेल त्याला सारखे प्रश्नच विचारत असतो. मला ना खूप खूप प्रश्न पडतात. कधी कधी आई त्याची उत्तरे लगेच देते. तर कधी कधी ती सांगतच नाही काही. मग मला अस्सा राग येतो ना कि काय सांगू? तुम्ही द्याल माझ्या प्रश्नांची उत्तरे?

पुढच्या वेळेला आणखी काही प्रश्न मी तुम्हाला सगळ्यांना विचारणार बरं का! Are you ready?

Saturday, December 24, 2011

ईशानी आणि ईशान्य


                                                     आनंदी-आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे लाडकी बाहुली होती माझी एक 
मिळणार तशी ना शोधुनी दुसऱ्या लाख   


गालावर खळी डोळ्यात हास्य घेवुनि  
अवखळ मी, दृष्टी घेई साऱ्यांची खिळवुनी


विचारांची मी समाधी लावतो 
थोर तत्त्ववेत्ता मी भासतो 


किती गोरी गोरी गाल गुलाबच फुलले 
हासती केस ते सुंदर काळे कुरळे  
झाकती उघडती बोलके हसरे डोळे 
अन ओठ जसे की आताच खुदकन हसलेदादाची मी लाडकी दीदीच दिसते 
दादासंगे खेळाया मला भारी आवडते 


Wednesday, July 13, 2011

माझी रायगड ट्रिप

मी आणि माझा दोस्त दर्शन रायगडावर गेलो होतो. आम्ही तिथे खूप मज्जा केली. मी रोपवेत सुद्धा बसलो होतो. मी अज्जिबात घाबरलो नाही. मी सारखा खाली बघत होतो. दर्शन सुद्धा नाही घाबरला! आधी मला रायगड म्हणजे शिवाजी महाराजांचे घरच वाटले होते. म्हणून मी सारखा आईला विचारत होतो की महाराज केव्हा भेटतील? मी तिथे अशी जागा बघितली जिथे त्यांना किंग बनवले होते. गडावर खूप धुके होते ना म्हणून मला काही काही ठिकाणे पाहता आली नाही. आईने मला हिरकणीची गोष्ट सांगितली होती. मी तिचा गाव पण पाहिला!!!
आणखी काय काय धम्माल केली सांगू का? अंह! पुढचा भाग नंतर! तोपर्यंत bye bye!!
 

Monday, July 11, 2011

माधव दादु झाला!हा आहे माधव चा छोटासा भाऊ.      ईशान्य!