Saturday, December 24, 2011

ईशानी आणि ईशान्य


                                                     आनंदी-आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे 



लाडकी बाहुली होती माझी एक 
मिळणार तशी ना शोधुनी दुसऱ्या लाख   


गालावर खळी डोळ्यात हास्य घेवुनि  
अवखळ मी, दृष्टी घेई साऱ्यांची खिळवुनी


विचारांची मी समाधी लावतो 
थोर तत्त्ववेत्ता मी भासतो 


किती गोरी गोरी गाल गुलाबच फुलले 
हासती केस ते सुंदर काळे कुरळे  
झाकती उघडती बोलके हसरे डोळे 
अन ओठ जसे की आताच खुदकन हसले



दादाची मी लाडकी दीदीच दिसते 
दादासंगे खेळाया मला भारी आवडते 


1 comment: