Monday, May 14, 2012

लब्बाड इशू!

 आज  न  मी तुम्हाला इशुची एक  गम्मत  सांगणार आहे! इशू पण खूप  बदमाष  झालाय  बरं.  त्याला मस्ती करायला फार आवडतं. तर एकदा ना तो सगळ्यांची  नजर चुकवून  टेरेस वर गेला. आईचं लक्ष  गेल्यावर ती त्याच्या मागे धावली. तर तो चक्क  टेरेस  वर लोळायला लागला.  हा पहा इथे!

अं  अं  मी नाही येणार!
मी इथेच खेळणार!
मग आई त्याला समजावू लागली कि अरे इशू असं टेरेस वर लोळू नये. घाण आणि माती लागेल कपड्यांना  वगैरे वगैरे.  त्यावर इशू उठून  उभा राहिला आणि टेरेस वर  इकडे तिकडे हिंडू लागला. त्याला तितक्यात  बॉल  सापडला. 
हे बघ आई! बॉल.....



 ईशान्य आता चांगलाच  रंगात आला होता. त्याने लगेच  तुळशीकडे त्याचा मोर्चा वळवला.  

तुळशीची माती ...किती छान 













माती अशी आकाशात  फेकतात 













जमिनीवर टाकतात


















काय  त्याची  मज्जा चालू  होती ते वरच्या फोटोवरून  कळतंय . त्याला खरं काय करायचं होतं टेरेस  वर हे मात्र  आणखी scroll केल्यावर कळेल. 

...............................................................................
...............................................................................
....................................................................................................................................................................................................................................................................................................................................
.
.
.
.
.


आणि खातात सुद्धा!


बरोब्बर चोर सापडला ! त्याला मातीच  खायची होती! 


4 comments:

  1. हाहाहा.. इशुचं पंचपक्वान्न ;)

    ReplyDelete
    Replies
    1. हो अगदी. अमृताहुनी गोड!

      Delete
  2. लबाडपणा करणे हा तर आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही बजावणारच.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी इशुच्या तोंडचं वाक्य लिहिलय.

      Delete